न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार सह शहर अभियंत्यांच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. ड्रेनेज विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्याकडे झोनिपू (स्थापत्य), बीएसयुपी, पंतप्रधान आवास, आर्थिक दुष्टया दुर्बल घटकांसाठी घरे या विभागांची नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे स्मार्ट सिटीचे कामकाज दिले आहे.
बदली झालेले सहशहर अभियंता अशोक भालकर यांच्याकडील स्मार्ट सिटीसह स्थापत्य (उद्यान), स्थापत्य (क्रीडा) हे विभाग सहशहर अभियंता सेठिया यांच्याकडे देण्यात आले आहेत.
सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे अ, ब, क, ई. फ आणि ग क्षेत्रीय कार्यालयांच्या स्थापत्य विभागाची जबाबादारी होती. त्यांच्याकडे ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयांचाही पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांचा कारभार जुंधारे यांच्याकडे आला आहे. सहशहर अभियंता प्रमोद भासे यांच्याकडे स्थापत्य प्रकल्पासह वाहतूक नियोजन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
—–


















