न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- गुटखा व सुगंधित सुपारीचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार कारवाई करीत २३,३५७ रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगधीत सुपारी जप्त केली. ही कारवाई (दि. २८) रोजी १२.३० वा. नरेंद्र ट्रेडर्स, आदित्य शगुन मॉल, शॉप नं. १७ बावधन येथे केली.
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सोपान हरीदास इंगळे (वय ३६ वर्षे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी गोविंदराम जेपारामजी प्रजापती (वय ४८ वर्षे, रा. १०४, विराज रेसीडन्सी एन.डी.ए.रोड बावधन खुर्द, पुणे) याच्यावर अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.