न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- घरी पायी जात असताना फिर्यादी महिलेला रस्त्यात अडवुन ” तु मला आवडतेस, माझ्याशी तु का बोलत नाही? माझे मोबाईल का ब्लॉक केला?”, असे म्हणुन फिर्यादीचा लोकांसमोर हात धरुन हाताने मारहाण केली.
फिर्यादी व फिर्यादीची बहिण या दोघींना सोडणार नाही, असा दम देवुन फिर्यादीचा विनयभंग केला. फिर्यादी व आरोपी यांची जुनी मैत्री आहे. हा प्रकार (दि. २७) रोजी आठ वाजता साई चौक, पिंपरीतील पियुष मोबाईल शॉपी ते शगुन चौकातील रिक्षा स्टॅन्ड येथे घडला.
२२ वर्षीय फिर्यादी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी सुरज संजय सुर्वे (वय २५ वर्षे रा. पिंपळे सौदागर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.
















