न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एचए कंपनीच्या मैदानात (दि. २२) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान तीन काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गायी चरण्यासाठी सोडुन फिर्यादी हे त्यांच्या राहते घरी जेवणासाठी गेले.
फिर्यादी परत सांयकाळी पाच वाजता मैदानात गायी नेण्यासाठी आले असता त्यांच्या गायी त्यांना त्या ठिकाणी मिळुन आल्या नाहीत. अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्या नऊ हजार रुपयांच्या गायी पळुन नेल्या आहेत.
फिर्यादी विक्रम कोंडु खंडारे (वय २० वर्षे, रा. बाबुराव काळोखे यांचे विटभट्टीवर, अभंग इंग्लिश स्कूलच्या मागे, गाथा मंदिर बायपास रोड, देहुगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















