- सरकारी कामात अडथळा; टोळक्यावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- साधन साहित्यासह भूकरमापक अधिकारी जमिनीच्या मोजणीला सुरवात करीत असताना तेथे उपस्थित महिला रंजना अर्जुन चौधरी, निर्मला शंकर चौधरी, ललिता सर्जेराव चौधरी, अंजली प्रतिक चौधरी यांनी जमिनीवर कोर्टात केस आहे. आमचा जमिनीवर ताबा चालु आहे, आम्ही मोजणी करु देणार नाही असे म्हणत सरकारी साहित्याची ओढातान केली.
फिर्यादी व मोना सोनवणे हे सरकारी साहित्याचे नुकसान होवु नये म्हणुन मोजणी साहित्याची सोडवणुक करित असताना उपस्थित महिलांनी फिर्यादीच्या सरकारी गणवेशावर लावलेली नेमप्लेट तोडली. उपस्थीत इतर पुरुषांनी गोधळ घालुन फिर्यादीशी झटापटी केली. धाक दपटशहाने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. कर्मचाऱ्यांशी झटापटी केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार (दि. २८) रोजी ११.३० च्या सुमारास बिरदवडी, ता. खेड, जि. पुणे, सर्व्हे नं. ७४/४, ७४/६ व आताचे जमिन गट नं. २५८ पैकी क्षेत्र ०० हे १२ आर येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी रंजना अर्जुन चौधरी, निर्मला शंकर चौधरी, ललिता सर्जेराव चौधरी, अंजली प्रतिक चौधरी, शुभम सर्जेराव चौधरी, विघ्नेश शंकर चौधरी, वेदांत शंकर चौधरी, सार्थक अर्जुन चौधरी, प्रणव सर्जेराव चौधरी, सुरज भानुदास चौधरी, अर्जुन सोपान चौधरी, शंकर सोपान चौधरी, विनायक काशिनाथ चौधरी, सर्जेराव काशिनाथ चौधरी, प्रतिक विनायक चौधरी (सर्व रा. बिरदवडी, ता. खेड जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















