न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- आदित्य बिर्ला कॅपिटल फायनान्समध्ये कर्मचारी असल्याचे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादित केला. फिर्यादीचे आदित्य बिर्ला कॅपिटल फायनान्समध्ये असलेले १,७१,००० रुपयांचे थकीत लोन भरणा करण्याकरीता आरोपीने बँक खात्यात भरणा करण्यास फिर्यादीला भाग पाडले. त्यांची फसवणुक केली.
ही घटना जुन २०२२ ते दि. १५ जुलै २०२२ दरम्यान साधना हॉटेल, शिवनेरी पतसंस्था, भोसरी येथे घडली. फिर्यादी विश्वास रामचंद्र काशिद (वय ५१ वर्षे, रा. निरंकारी कॉलनी, शिवनगरी, गणपती मंदिराशेजारी, आदर्शनगर, दिघी) यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी विनोद शुक्ला (नाव सांगत असलेला मो नं. ७९८०७९०७८८ धारक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहे.