- राज्य सरकारची घोषणा; या आहेत अटी अनं शर्थी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- फक्त नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, यासाठी तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना बिनव्याजी दहा हजार ते एक लाख रुपये कर्ज मिळते. शासनाच्या या कर्ज योजनेमुळे मराठी तरुणांचे स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. बिनव्याजी अशी ही कर्जयोजना आहे.
परतफेड प्रतिदिन ₹१०
जेव्हा तरुणांना सर्वप्रथम दहा हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल, तेव्हा त्यांना दहा रुपये प्रतिदिन याप्रमाणे कर्ज फेडावे लागणार आहे. कर्जाची मर्यादा वाढवून ५० हजार रुपये होईल तेव्हा प्रतिदिन ५० रुपये, तर १ लाख रुपये कर्ज मिळाल्यानंतर १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागणार आहे.
काय आहे योजना?
ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. या योजनेसाठी १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळते. विशेष म्हणजे या योजनेतील कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. बिनव्याजी अशी ही कर्जयोजना आहे.
अर्ज कोठे करणार?
या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.
लाभासाठी हे आवश्यक
■ आधार कार्ड रहिवासी पुरावा ■ उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र
आधी दहा हजार, ५० हजार, नंतर १ लाख
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम दहा हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा त्यांनी विनियोग कसा केला, हे तपासले जाणार आहे. हे तपासत असताना त्यांनी कर्जाची परतफेड कशी केली आहे, याचीही तपासणी होणार आहे. कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर त्यांना पुढच्या टप्प्यात ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. या ५० हजार रुपयांच्या कर्जाची देखील परतफेड वेळेत केली तर त्यांना पुढील टप्प्यात एक लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे.


















