न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा व शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर व इतर समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना उपशहरप्रमुख श्री. हरेश आबा नखाते जनसंपर्क कार्यालय येथे आज शनिवारी (दि. २६) रोजी करण्यात आले.
यावेळी शहिदांना मानवंदना देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पिंपरी विधानसभा माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, युवा कीर्तनकार हभप शेखर महाराज जांभुळकर उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी यावेळी तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारे कार्यक्रम आयोजित करणे ही सद्ययुगाची गरज असल्याचे सांगितले.
यानंतर सध्याचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांना स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतीसाद दिला. तसेच हेल्थ कार्ड, सुकन्या समृध्दी योजना, पोस्ट इन्सुरन्स, पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड, आयुर्वेदिक औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अनंत कोऱ्हाळे, हाजी दस्तगिर भाई मणियार, संतोष सौंदणकर, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, संदीप भालके, विजय दर्शीले, हेडपोस्टमास्तर शरद लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मंजाळ, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष सखाराम नखाते, सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे, सुनिल पालकर, प्रवीण केमसे, बँड पथक संघटनेचे सागर गायकवाड, पत्रकार मंगेश सोनटक्के, ऍड. चंद्रकांत गायकवाड, मनसे महिला आघाडीच्या अनिता पांचाळ, तस्लिम शेख, मीना वराट, अरुणा माने, सुनीता पठारे, पूनम रिटे, विद्या सुर्वे, दीपक भक्त तसेच काळेवाडी प्रभागातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, काळेवाडी महिला संघटिका सौ. सुजाता नखाते यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, हनुमंत पिसाळ, गणेश वायभट, गणेश आहेर, गणेश पाडोळे, रविकिरण घटकार, सावता महापुरे, सुभाष लोंढे, भरत शिंदे, नरसिंग माने, दत्ता गिरी, अमोल राठोड, बाळासाहेब येडे, प्रजाक नडे, महादेव बिकड, विकास काजवे, एकनाथ पांचाळ, कानिफनाथ तोडकर यांचे सहकार्य लाभले.