न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- तळेगाव एमआयडीसीमधील एल अॅन्ड टी डिफेन्स कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांचे पुण्यातील अप्पर कामगार आयुक्तालयासमोर गेल्या ४२ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे.
त्यांना न्याय न मिळाल्याने आ. सुनील शेळके हे कामगारांच्या पाठीशी उभे रहात उद्या शुक्रवारी स्थानिक भुमिपुत्रांंना सोबत घेऊन तळेगाव एमआयडीसी बंदची हाक दिली आहे.
लार्सन अॅण्ड टुब्रोच्या तळेगांव प्रकल्पातून १६ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून बदली करण्यात आलेल्या सर्व कामगार सभासदांना त्यांच्या पूर्वीच्याच कामाच्या जागेवर संपूर्ण सेवा सलगतेसह काम देण्यात यावे. मधल्या काळातील संपूर्ण वेतन कामगारांना देण्याची व्यवस्था करण्यात यावी. पुणे औद्योगिक न्यायालयाने गेल्या १४ मार्च १२ एप्रिलला दिलेल्या आदेश हुकूमाचे पालन करण्यात यावे. आदी मागण्यांसाठी २३६ कामगार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी व न्यायासाठी कामगार आयुक्तांलयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत.