न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- कासारवाडी येथील पार्श्वनाथ युवक मंडळ व पगारिया परिवाराच्या वतीने स्व. प्रा. प्रकाश पगारिया यांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त ३८ वे रक्तदान शिबिर कासारवाडीतील जैन स्थानकात आज गुरुवारी (दि. १) रोजी आयोजित केले होते. या शिबिरात ७२ जणांनी रक्तदान केले.
आधार ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या संयोजनासाठी प्रा. अशोककुमार व विलासकुमार पगारिया यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, मा. अध्यक्ष संदीप फुलफगर, पंकज कांकरिया, राहुल, कल्पेश, मयुर, विपुल, गौरव पगारिया, मकरंद शहापुरकर यांनी पुढाकार घेतला.