- वधू पक्षाकडून पोलिसात धाव; वराकडील मंडळीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- विवाह ठरलेला असताना वराकडील आरोपींनी वधूकडील फिर्यादीकडे २५ तोळे सोने व २ लाख रुपये हुंड्याची मागणी केली. लग्नाआधी बैठकीत फिर्यादीकडुन वरास ४ तोळे सोने, वधूस ७ तोळे सोने तसेच वरास ५१ हजार रुपये हुंडा आणि साखरपुड्याचा ड्रेस, साखरपुडा व लग्न करून देण्याचे ठरले होते. तसेच वराकडुन वधूस ४ तोळे सोने, ११ तोळे चांदीचे पैजन व साखरपुड्याची साडी देण्याचा ठराव झाला होता. फिर्यादीने साखरपुड्यामध्ये ठरल्याप्रमाणे ३ तोळ्याची सोन्याची चैन व १ तोळ्याची सोन्याची वेढणी / अंगठी आणि साखरपुड्यासाठी ४,५६,८०० रुपये खर्च केला.
प्रसंगी वराकडील मुलगा आरोपी क्र. १. त्याची आई आरोपी क्र.२. आरोपी क्र.१ याचा मोठा भाऊ आरोपी क्र.३ व लहान भाऊ आरोपी क्र. ४ या आरोपींनी फिर्यादीकडे हुंडा म्हणुन इचलकरंजी येथे घर घेऊन देण्याची मागणी केली. ती मागणी फिर्यादीने मान्य केली नाही म्हणूनच वराकडील आरोपींनी लग्न मोडुन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीचे दागिने परत न करता त्याचा अपहार केला. फिर्यादीची समाजामध्ये नुकसान आणि बदनामी केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते आजपर्यंत फिर्यादीच्या स्विस काऊंटी सोसायटी, बिल्डींग नं. ए-६०३. थेरगांव येथे घडला. फिर्यादी सुखदेव भिमाशंकर भिसे (वय ४६ वर्षे, रा.थेरगांव) यांनी आरोपी उमेश सुरेश गोगेकर (वय २६ वर्षे), महिला आरोपी, महेश सुरेश गोगेकर (वय २८ वर्षे), सतिष सुरेश गोगेकर (वय २४ वर्षे, रा. सर्व, इचलकरंजी, जिल्हा- कोल्हापूर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















