न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व एस एन बीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा (दि. १) रोजी मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी मैदान, नेहरूनगर येथे संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन श्वेता पैठणकर, यांनी केले. फिरोज शेख संचालक एस ए सोसायटी, अनिल जगताप हॉकी स्पर्धा प्रमुख यांच्या हस्ते झाले. स्पर्धा १४,१७,१९ या वयोगटात मुला-मुलींच्या होत्या.
१४ वर्षाखालील मुले वयोगटात प्रथम क्रमांक एसएनबीपी स्कूल, मोरवाडी (१७०७) स्कोर १-० (अठराव्या मिनिटाला आर्यन गायकवाड याने एक गोल केला)
द्वितीय क्रमांक एसएनबीपी स्कूल, चिखली, तृतीय क्रमांक सेंट ज्यूड हायस्कूल देहूरोड.
१७ वर्षाखालील मुले वयोगटात प्रथम क्रमांक एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी (१७०७) स्कोर १-० (२७ व्या मिनिटाला अंकुल गोकुळ याने एक गोल केला), द्वितीय क्रमांक सेंट उर्सुला हायस्कूल, आकुर्डी, तृतीय क्रमांक सेंट ज्यूड हायस्कूल, देहूरोड.
१९ वर्षाखालील मुले वयोगटात प्रथम क्रमांक एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी: ४:०, २८ व्या व ३५ व्या मिनिटाला अमन शहा यांनी दोन गोल केले
३३ व्या व ५१ व्या मिनिटाला आकाश शिंग याने दोन गोल केले. अमन शहा – २ गोल (२८ व्या मि. व ३५ व्या मि.) आकाश सिंग – २ गोल (३३ व्या मि. ५१ व्या मि.) द्वितीय क्रमांक: जय हिंद हायस्कूल पिंपरी, तृतीय क्रमांक एस एन बी पी स्कूल अँड कॉलेज, मोरवाडी
१४ वर्षाखालील मुली वयोगटात प्रथम क्रमांक एसएनबीपी स्कूल मोरवाडी – स्कोर १-० १३ व्या मिनिटाला नंदिनी निंबाळकर हिने गोल केला, द्वितीय क्रमांक द न्यू मिलियम स्कूल सांगवी, तृतीय क्रमांक सेंट जुड स्कूल देहूरोड
१७ वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक: सेंट ज्यूड स्कूल स्कोर – १-० ३७ व्या मिनिटाला संतोषी चौधरी हिने गोल केला द्वितीय क्रमांक: एस एन व्ही पी स्कूल मोरवाडी तृतीय क्रमांक: एस एन बी पी स्कूल अँड कॉलेज मोरवाडी
१९ वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक: एस एन बी पी स्कूल मोरवाडी – स्कोर ५-० ३ ऱ्या ,४० व्या ,५०व्या मिनिटाला फिरदोस सय्यद हिने तीन गोल केले व ज्ञानेश्वरीने १४ व्या ,१८ व्या मिनिटाला दोन गोल केले. द्वितीय क्रमांक: द न्यू मिलेनियम तृतीय क्रमांक एस एन बी पी स्कूल अँड कॉलेज, मोरवाडी यांनी पटकाविला.


















