न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- मिलिंदनगर येथील पान टपरीवर पान खात उभा असताना (दि. ४) रोजी रात्री १०.३० वा सुमारास फिर्यादी तरुणासमोर तिघेजण आले. त्यापैकी आरोपी फिर्यादीला म्हणाला, तु माझ्याबद्दल लोकांसमोर वाईट का बोलतोस? आरोपीने फिर्यादीला शिवीगाळी केली. फिर्यादी विनाकारण शिविगाळी का करतोस म्हणुन विचारले असता तिघांनी फिर्यादीला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली.
झटापटीत आरोपीच्या हातातील कोयत्या सारखे दिसणारे हत्यार फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर लागल्याने फिर्यादीच्या हातातुन रक्त येवु लागले. फिर्यादीने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी तिथून निघुन गेले.
फिर्यादी करणसिंग चरणसिंग टाक (वय १९ वर्षे, रा. मिलींदनगर, स्मशानभुमीजवळ, पत्राशेड, पिंपरी) यांनी आरोपी किरण डोंगरे (वय १७ वर्षे), विशाल घोडके (वय १८ वर्षे, रा. पवना गार्डनजवळ, काळेवाडी), प्रशांत डिगे (वय २७ वर्षे, रा. मिलिंदनगर पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















