न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- पिंपळे सौदागरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली पिडीत महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले आहे. तिला पैशांचे अमिष दाखवत तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपी यांनी स्वतःची उपजिवीका भागवीत असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षास मिळाली.
पोलिसांनी (दि. ६) रोजी सायं. ७. ४५ वा. सुमा. कुणाल आयकॉन रोड, फ्लॅट नंबर ए-३०२, साई अॅम्बियन्स सोसायटी, तिसरा मजला, पिंपळे सौदागर येथील ए वन स्पामधील रुम नं १ मध्ये छापा मारला. पिडीत महिलेची सुटका केली.
आरोपी स्पा मॅनेजर दत्तात्रय सुकवंत पवार (वय ३४ वर्षे, रा. हंगरगा ता. निलंगा जि. लातुर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार आरोपी देवीदास सुभाष दहीफळे (वय ३३ वर्षे रा. पाथर्डी रोड, चिंचपुर इजादे, अहमदनगर) याचा सांगवी पोलीस तपास करीत आहेत.