न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- वडमुखवाडीतील के. के. केअर हॉस्पिटल येथील आळंदी सेवा रस्त्याच्या पुढे (दि. ५) रोजी ४. ४० वा. च्या सुमारास अज्ञात वाहनावरील चालकाने वाहन हयगयीने नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने चालवले. फिर्यादीच्या मुलास धडक दिली.
अपघातात गंभीर दुखापत होऊन फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला. तसेच अपघाताची खबर न देता आरोपी वाहनचालक पळून गेला. सागर नारायण कळसाईतकर (वय २४ वर्षे) असे मयत मुलाचे नाव आहे.
फिर्यादी महिला (वय ४७ वर्षे) यांनी आरोपी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.