न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- ” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तुमच्याकडे २ रुपये असतील तर १ रुपयाचे पुस्तक घ्या व १ रुपयाची भाकर घ्या पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल व भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच शैक्षणिक विचारांचा आदर्श घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने भिमसृष्टी स्मारक पिंपरी येथे बाबासाहेबांना अपेक्षित अभिवादन करण्यासाठी वही पेन पुस्तके संकलन अभियान राबवण्यात आले.
पिंपरी भिमसृष्टी स्मारक येथे सकाळी १० ते सायंकाळी १० पर्यंत वही पेन पुस्तके संकलन अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून ९६.५ डझन वह्या, ५० डझन पेन६ डझन पेन्सिल साहित्य जमा झाले तसेच आर्थिक स्वरूपात ४ हजार रुपये आर्थिक मदत जमा झाली.
या उपक्रमात पिंपरी चिंचवड शहर परिमंडळ १ पोलीस उपायुक्त विवेक पाटील, माजी.नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, माजी.नगरसेविका निकिता कदम यांनी सहभाग घेऊन वही पेन दान देऊन या उपक्रमात सहभाग घेतला.
वही, पेन, पुस्तके संकलन अभियानाच्या माध्यमातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य हे पिंपरी चिंचवड शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांनी संस्थेच्या www.Rayatvvm.org वेबसाईटला भेट देऊन संपर्क साधावा.अथवा संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या 9604683459 या क्रमांकावर संपर्क साधावा..
वही पेन संकलन करण्याकरिता करिता रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, राज्य सचिव निरज भालेराव, राज्य संघटक रोहित कांबळे, राज्य सहसचिव भाग्यश्री आखाडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप, शहर कार्याध्यक्ष योगेश कांबळे, शहर उपाध्यक्ष समाधान गायकवाड, शहर समन्वयक प्रतिभा बनसोडे, मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे, मावळ तालुका महासचिव विक्रांत शेळके, शहर सदस्य शारदा भोसले यांनी मेहनत घेतली.















