न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- भाच्याच्या लग्नासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील ऑर्चीड हॉटेलच्या ओ.सी.सी. लॉबीत फिर्यादीने काळया रंगाच्या बॅगमध्ये ऐवज ठेवला होता.
आरोपी अज्ञात चोरटयाने त्यातील १७,५०,००० रुपये किंमतीचे ६५० ग्रॅम सोन्याचे दागिने, १,००,००० किंमतीचे डायमंडचे हेअरींग, ९,००,००० रु रोख रक्कम, आधारकार्ड, १०,००० किंमतीचा विवो कंपणीचा मोबाईल, असा एकुण २७,६०,००० रुपये किमतीचा ऐवज (दि ६) रोजी ४.१५ वा. च्या सुमारास चोरी करुन नेला आहे.
फिर्यादी विक्रमकुमार बाबुलाल भोजाणी (वय-४७ वर्षे, रा. १२ माऊन्ट जॉय रोड, हनुमतनगर, बेंगलोर) यांनी अज्ञात इसमाविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.