न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रफीक भाई कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली मागसवर्गीय कक्ष सहाय्यक आयुक्त मुकेश काकडे यांची नुकतीच भेट घेतली.
यावेळी त्यांचेशी चर्चा केली असता, असे समजले की, शिक्षक भरतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उर्दू शिक्षक भरतीचा प्रस्तावच पाठवलेला नाही. शहरात उर्दू शिक्षक कमी असल्यामुळे उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलांचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे भाजपधार्जीण्या महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला असून, लवकरात लवकर उर्दू शिक्षक भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात यावा अन्यथा समाजवादी पक्षाच्या वतीने हजारोंच्या संख्येने महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शहर अध्यक्ष रफीक भाई कुरेशी, शहर उपाध्यक्ष सालारभाई शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष इमाम नदाफ यांनी दिला आहे.











