न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील तीन संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९) अंतर्गत कारवाई केली आहे. या वर्षी आजपर्यंत १८ गन्ह्यांत १२९ आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पहिली कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ चे मंचक इप्पर यांच्या मार्फत चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १६७८/२०२२ भादंवि कलम ३०७, ४५२, ३२४, ५०६ ४२७ ३४ आर्म अॅक्ट ४(२५), महा.पो.का. कलम ३७ (१) १३५ सह, क्रि. लॉ. अॅ. अॅक्ट कलम ३ व ७ च्या तपासामध्ये आरोपी सत्यम ऊर्फ पप्पू दतात्रय कड (वय-२२ वर्षे, रा. बापदेव वस्ती, कडाची वाडी, चाकण), (टोळी प्रमुख) व इतर २ यांच्याविरूध्द खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, गर्दी, मारामारी, खंडणीसाठी अपहरण, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून अपक्रिया करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कर्मचा-यांवर हल्ला असे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.
दुसरी कारवाई तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्फत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. ४००/२०२२ भा. दं. वि. कलम ३०७, ३२४. १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट क. ४ (२५) महा.पो.अधि.कलम ३७ (१) सह १३५ चे तपासामध्ये आरोपी कुणाल ऊर्फ बाबा धीरज ठाकुर (वय २२ वर्षे, रा. भुजबळ हॉलचे समोर, गणपती चौक, तळेगाव दाभाडे) (टोळी प्रमुख) व इतर १३ यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, दुखापत, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, मृत्यु किंवा जबर दुखापत करण्याची भीती दाखवून बदलादग्रहण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणे, तसेच बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे असे एकुण ७ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत आरोपींवर दाखल आहेत.
तिसऱ्या कारवाईतही तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्फत तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. २७२ /२०२२ भादवि कलम ३०७, ३५३, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट क. ४(२५) महा. पो. कायदा कलम ३७(१) सह १३५ चे तपासामध्ये आरोपी करणसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय-२५ वर्षे रा. अंध शाळेचे पाठिमागे, रामटेकडी हडपसर) (टोळी प्रमुख) व इतर १ यांच्याविरूध्द खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा करून जिवघेणा हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, चोरी, दिवसाची घरफोडी चोरी, रात्रीची घरफोडी चोरी व बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे असे एकूण ८ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत आरोपींवर दाखल आहेत.
सर्व आरोपी हे संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याकडे पाठविला होता. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) व पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी प्रस्तावामधील कागदपत्राची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून हा प्रस्ताव आदेश पारीत करण्याकरिता अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याकडे पाठविला होता. त्याबाबत आज (दि ८) डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली, बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, वैभव शिनगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.ना. व्यंकट कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो.ना. बर्डे, पो.शि गुंजाळ, चाकण पोलीस ठाणे, पो.शि. विकास तारू, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.