न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२२) :- चाकण-शिक्रापुर रोडवरील शेलपिंपळगाव येथील ओंकार ढाबा येथे ढाबा चालकाने एका महिण्यापुर्वी परराज्यातील कामगाराचा खुन केला असुन त्याने त्याची मयत बॉडी कोठेतरी फेकुण विल्हेवाट लावली असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हा गुन्हे शाखा ३ व शस्त्रविरोधी पथकाला मिळाली.
पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड आणि त्यांच्या पथकातील पोलीस उप-निरीक्षक गिरीश चामले व अंमलदार हे वेशांतर करुन ओंकार ढाबा येथे गेले. ढाबा चालक व कामगारांची माहीती काढली. शस्त्रविरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी यातील संशयीतांना ताब्यात घेत गुन्ह्याचा छडा लावला. त्यानुसार शस्त्र विरोधी पथकाचे स.पो.नि. देशमुख व पथक तसेच गुन्हे शाखा युनिट-३ चे पो.उप.नि. चामले व पथक यांनी शेल पिंपळगाव येथुन संशयीत आरोपी ढाबा चालक ओंकार अण्णाराव केंद्रे (वय २१ वर्षे, रा. ओंकार ढाबा, चाकण शिक्रापुर रोड, शेल पिंपळगाव, मुळ रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड), व त्याचा लहान भाऊ कैलास अण्णाराव केंद्रे (वय १९ वर्षे, रा. ओंकार ढाबा, चाकण शिक्रापुर रोड, शेल पिपळगाव, मुळ रा. दिग्रस, ता. कंधार, जि.नांदेड) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाब्यावर ७ दिवसापुर्वीच मयत प्रसेनजीत गोराई (वय ३५ वर्षे रा. जिल्हा २४ परगना, राज्य पश्चिम बंगाल) याच्या जेवणात मिठ जास्त झाल्याच्या कारणावरून आरोपींशी वादावाद झाला. (दि. २६/१०/२०२२) रोजी रात्री ओंकार ढाबा येथे आरोपींनी त्याच्या डोळयामध्ये मिरची पावडर टाकुन त्याला लाकडी दांडके, लोखंडी रॉड व वायरने मारहाण करून जिवे ठार मारले. त्याची बॉडी दिवसभर ढाब्यावरील आतल्या खोलीत लपवुन ठेवली. (दि. २८/१०/२०२२) पहाटे दरम्याण डोंगराळ भागातील एका ओढयात बॉडी फेकुन वील्हेवाट लावली. तपासात बॉडी ही मयत प्रसेनजीत गोराई (वय ३५ वर्षे रा. जिल्हा २४ परगना राज्य पश्चिमबंगाल) याची असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना चाकण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे. हा प्रकार आरोपींनी ढाब्यावर कामास असलेल्या अन्य ३ परराज्यातील कामगारापुढेच केला होता. परंतु त्यांनी त्यांनासुध्दा जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने त्यांनी तो प्रकार कोणासही न सांगत घाबरुन ते तेथेच काम करत होते.
गुन्हयाची उकल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, स.पो.नि. अंबरीश देशमुख (शस्त्रविरोधी पथक), पो.उप-निरीक्षक गिरीश चामले, पो.हवा./४७९ सानप, पो. हवा/७५५ आढारी, पो.हवा/९१९ मोरे, पो.ना./१४५६ भोसुरे, पो.शि./१९४० हनमंते, पो.शि./२३९९ बाळसराफ, पो.शि./२७१८, सुर्यवंशी, पो.शि/१२८१ कोळेकर, पो.शि./२२७३ दांगट, पो.शि./२८९५ फापाळे, पो.शि./२८८३. काळे, पो.शि./२८७७ मिरगळ, पो.शि./२२९६ जैनक, पो.ना./१६६६ भालचिम, पो.ना./११४४ लांडे, पो.शि./२००१ नांगरे यांनी तसेच शस्त्रविरोधी पथकाचे सहा. फौजदार शाम शिंदे. एल. के वाव्हळे, पो.हवा./६४६ प्रितम वाघ, पो. हवा / ९०१ वसिम शेख, पो.शि./२३८२ शेळके यांचे पथकाने केली आहे. तांत्रीक विष्लेशन शाखा पोलीस हवालदार माळी यांनी तपास पथकास विषेश सहकार्य केलेले आहे.