- बस अतिवेगात चालवून पोहोचविला विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०२२) :- शाळा सुटल्यानंतर स्कुल बसमधुन घरी जात असताना बसचालक आरोपी बसमध्ये मोठ्याने गाणी लावत असे. त्यामुळे फिर्यादीसह व तीच्या मैत्रीणीने आरोपीला आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावर तुम्हाला काय करायच आहे. मी मोठ-मोठ्याने गाणी लावणारच, असे म्हणत फिर्यादीकडे बघुन आरोपी गाणी म्हणु लागला.
फिर्यादीने पुन्हा त्याला आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीच्या मोबाईलवर आलेला फोन कट करीत आरोपीने चालु बसमधुन फोन बाहेर फेकुन दिला. बस अतिवेगाने चालवली. त्यामुळे बस रस्त्यात बंद पडली. बसमधील मुले घाबरुन बसमधुन खाली उतरली. मत्र आरोपीने फिर्यादीला बसमधुन उतरु दिले नाही. रस्त्याने जाणा-या एका गाडीवाल्याने बसच्या मागुन धुर निघत आहे, असे आरोपीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीची मैत्रिण आरोपीला तु काय केलं? आमच काही झालं असतं तर? असे म्हणाली. आरोपी फिर्यादी व फिर्यादीच्या मैञिणजवळ येत अंगावर आला. आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीचा डावा हात पकडुन, आता तुम्ही काय करणार, तसेच फिर्यादीच्या खाद्यांला हात लावुन फिर्यादीच्या छातीजवळ येऊन बॅड टच केले. त्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना मागिल सहा महिन्यापासुन ते (दि. ८/१२/२०२२) रोजी दुपारी १२.३० ते १.३० वा. दरम्यान खराळवाडी, पोतदार शाळेमागील बाजुस घडली. महिला फिर्यादीने आरोपी पिंकु कुमार (वय ३० वर्षे, अंदाजे, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.