- जाधववाडीतील घटना; पतीसह सासू सासरे गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०२२) :- फिर्यादीच्या मुलीचा विवाह (दि. २०.०५.२०२२) अक्षय कन्हैयालाल जाधव (रा. जाधववाडी, चिखली) याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी विवाहितेला वेळोवेळी हाताने मारहाण केली. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सारखे टोमणे मारून, तिला मानसीक त्रास देत तिचा छळ केला. तिला किटकनाशक औषध पिवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
ही लग्नानंतर (दि. ७) पर्यंत सुरु होता. महिला फिर्यादी यांनी आरोपी पती अक्षय कन्हैयालाल जाधव (वय २९ वर्षे, रा जाधववाडी चिखली), सासरे कन्हैयालाल किसनलाल जाधव (वय ५९ वर्षे), सासु महिला आरोपी, नणंद महिला आरोपी, संजय गांधिले (पती अक्षय याचा नातेवाईक) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.


















