न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०२२) :- एकदाच वापरल्या जाणाऱ्या आणि विघटन होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू वापरावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे प्लास्टिक उद्योगासह अन्नपदार्थ, मिठाई व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ७० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
विघटन होणाऱ्या पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी उठविली आहे. तसेच ५० ग्रॅम प्रतिचौरस मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरालाही परवानगी आहे. मात्र, या वस्तू विघटन होणाऱ्या असल्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अण्ड टेक्नॉलॉजी’ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे उत्पादकांना बंधनकारक असणार आहे.
राज्य सरकारने १ जुलै २०२१ रोजी सर्व प्रकारच्या पिशव्या (कॅरिबॅग्ज), ताटे, वाट्या, ग्लास, काटे, चमचे, सुन्य, स्ट्रॉ, कंटेनर, हवाई फुग्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या काडया, प्लास्टिक ध्वज, मिठाई बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटांचे आवरण यासाठी वापरल्या जाणाऱ्या फिल्म, प्लास्टिक फलक आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्माकोलवर बंदी घातली होती.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या वस्तू प्रमाणित करून घेणे बंधनकारक असेल. याबाबत संभ्रमावस्था आहे. याबाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
– अजय चारठाणकर,उपायुक्त, महापालिका…


















