न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- राज्य पोलीस दलातील २२५ पोलीस निरीक्षक आणि ३३५ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये दोन पोलीस निरीक्षकांची तर सात सहायक पोलीस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी शुक्रवारी (दि. ९) आदेश दिले आहेत.
संबंधित घटकातील कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गोंदिया येथून तेजस्विनी अभिजित कदम तर गडचिरोली येथून दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी यांची बदली झाली आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभागातून स्पृहा संदीप चिपळूणकर, सोनिया भगवान गोसावी, नागपूर शहर येथून कैलास श्रावण कुथे, मुंबई शहर येथून सचिन गोरखनाथ कदम, जितेश चंद्रशेखर शिंगोटे, राजेश दत्तू खांडे, वसंत विठ्ठल देवकते यांची शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात झालेल्या बदल्यांमध्ये ३२ पोलीस निरीक्षकांना पोलीस उप अधीक्षक, सहायक आयुक्तपदी बढती मिळणार असल्याने त्यांना केवळ महसूल संवर्ग वाटप करण्यात आले आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश लवकरच येणार आहेत.
पिंपरी- चिंचवड शहर पोलीस दलातील हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक वसंतराव मुगळीकर, हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकराजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने, गुन्हे शाखा युनिट पाचचे रामदास जयसिंग इंगवले, जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष मधुकर कल्याणकर या सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्यानंतर तसेच इतर काही ठिकाणी पोलीस निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.


















