- रावेतमधील घटना; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- सर्व्हे नं. ९७/२ ही फिर्यादीच्या मालकीची जागा त्यांची फसवणुक करीत आरोपींनी एस.पी. डेव्हलपर्सला दिली. सह आरोपी यांनी त्या जागेत विनापरवाना बेकायदेशिर अतिक्रमण करुन जागेचा ताबा घेतला.
फिर्यादीची चालु बाजारभावाप्रमाणे अडीच कोटीची जागा ५० लाख रुपयांमध्ये खंडीणी स्वरुपात बळकावण्याच्या उद्देशाने तसेच फिर्यादीना जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी बाळासाहेब व्यंकटराव गायकवाड (वय ४८ वर्षे, रा. सेक्टर २६, प्लॅट नं ५२, निगडी प्राधिकरण) यांनी राजु गोकुळ म्हस्के (रा. म्हस्के वस्ती, रावेत), महीला आरोपी (रावेत), नितीन छगणलाल जैन (रा. नेहरुनगर, पिंपरी), राहुल किरणराज चोपडा (रा. प्रधिकरण निगडी), दत्तात्रय रामचंद्र पवळे (रा. पवळे सदन, निगडी), कपील बसंतीलाल चोपडा (रा. प्रधिकरण निगडी), गोकुळ भिका म्हस्के (वय ५० वर्षे, रा. निसर्ग ग्रुप सोसा. म्हस्के वस्ती, रावेत) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.


















