न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- फिर्यादी हे डॉक्टर असुन आरोपीचे फिर्यादीच्या दवाखान्याशेजारी किराणा मालाचे दुकान होते. त्यामुळे आरोपी व फिर्यादी यांची चांगली मैत्री होती. आरोपी हा बाहेरगावचा असल्याने त्याला कोणी बँक कर्ज देत नव्हते. तसेच आरोपीकडील काही लोकही आरोपीला भिसीचे पैसे देत नसत. त्यामुळे आरोपीने फिर्यादीकडे आर्थिक मदत मागितली.
‘ मी काही सावकार नाही मी एक डॉक्टर आहे ‘ असे फिर्यादीने आरोपीला सांगितले. आरोपीने फिर्यादीला प्रत्येक वेळी तुम्ही फक्त गुंतवणूकदार म्हणुन मला आर्थिक मदत करा; तुम्ही जेवढे गुंतवणूक कराल त्या बदल्यात दरमहा नफा व त्या बदल्यात तुमचे पैसे डबल करण्याची जबाबदारी माझी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा मी एक व्यापारी आहे ‘, असे फिर्यादीला अमिष दाखविले. आरोपीच्या अमिषाला बळी पडून फिर्यादीकडून आरोपीने मुदतीत वेळोवेळी घेतलेली रक्कम परत न करता त्यांचा विश्वासघात केला. फिर्यादीची १५,६०,००० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीस फोनवरुन आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ मध्ये वराळे येथे घडला. फिर्यादी गणेश मुरलीधर सोनवणे (वय ३८ वर्षे, व्यवसाय डॉक्टर रा. वराळे, रोशन वन सोसायटी, शॉप नं. ८ संजिवनी हॉस्पिटल, ता. खेड, सध्या रा. शुभश्री रेसीडेन्सी, सी. १. फ्लॅटनं. ६०४, आकुर्डी) यांनी आरोपी पप्पु रामदेवाशी (रा. वराळे, रोशन वन सोसायटी, मुळगाव जादान, ता. खर्ची मारवाड, जि. पाली, राज्य राजस्थान) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
















