न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रिव्हर स्कॉड (River squad) ची स्थापना करण्यात आलेली आहे. नदी, नाल्याच्या पात्रात तसेच नदीलगत खाजगी जागा मालकांकडून भराव टाकणाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
(दि. १) ते (दि. ८) रोजी किवळे – स्मशानभूमी, पिंपळे गुरव काशिद पार्क, पिंपळे निलख – विनायक नगर, रावेत वाल्हेकरवाडी जाधवघाट, पिंपरी वैभव नगर आदी भागात राडारोडा टाकणाऱ्यांवर रिव्हर स्कॉडमार्फत नियमानुसार कारवाई करण्यात आली. यात एकुण र.रु. २,०३,८०० इतका दंड आकारण्यात आलेला आहे.
राडारोडा उचलण्यासाठी मनपाचा टोल फ्री क्रमांक १८००१२०३३२१२६ उपलब्ध आहे. शहरातील नदी / नाल्यालगत खाजगी जागेवर तसेच नदी नाल्याच्या जागेत अनाधिकृत भराव टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालिकेने केला आहे.
















