न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- पार्लेजी बिस्कीट, मारब्लो सिगारेट डिस्ट्रब्युटर्स आणि शेती व्यवसाय फिर्यादीचा आहे. फिर्यादीना स्व संरक्षणासाठी आर्म लायसन्स पाहीजे होते. लायसन्स मंजुरीसाठी फिर्यादीने गुह विभाग, मुबई मंत्रालय येथे अर्ज केला होता. फिर्यादीच्या मित्राची ओळख सांगुन आरोपीने फिर्यादीला फोन केला. अर्ज प्रकरण मी करुन देतो, असे फिर्यादीला सांगितले.
आरोपीने फिर्यादीचा मावस भाऊ याच्या राहत्या घरी फिर्यादीला बोलावुन घेत ‘ मी मुंबई मंत्रालयमध्ये असतो. मी गृह विभागातील कामे पाहत असतो. मला तुमची फाईल तिथे मिळाली. त्यावरुन मी तुमचा मोबाईल फोन घेवुन तुमच्याशी संपर्क केला आहे. मी शहरामध्ये अनेकजनांचे शस्त्र परवाने मंजुर करुन दिलेले आहेत. तुमचे शस्त्र परवानाचे लायसन्स मंजुर करुन द्यायचे असतील तर तुम्ही तुमचे काम मला द्या. मी तुम्हाला ५-६ महिन्यात तुमचे काम करुन देतो. ‘ असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडुन जानेवारी २०१९ पासुन ते आजपर्यंत एकूण ८,६३,००० रुपये बँक खाते तसेच रोख स्वरुपात घेवुन काम न करता पैसे परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना जानेवरी २०१९ पासुन ते आजपर्यंत गवळी हाईट्स, शॉप नं. २ तापकिर नगर, काळेवाडी येथे घडली. फिर्यादी प्रसाद उर्फ दिगंबर तुकाराम फुगे (वय २७ वर्ष, रा. राधानगरी हौसिंग सोसायटी, दिघी रोड, बाबाजी निवास, भोसरी) यांनी आरोपी राज (ऊर्फ धनराज) बाळु गायकवाड (वय ३० वर्षे, अंदाजे रा. कडवळवस्ती, लोहगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















