न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२२) :- पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी असे एकूण ११ जणांना निलंबित केलं आहे.
चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर तिघांनी शाई फेकली होती. दरम्यान या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
















