न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२२) :- ट्रेडर इन्वेस्टरला फिर्यादीने रिक्वेस्ट पाठवली. अॅक्सेप्ट केल्याने फिर्यादीने चॅटींग केले. मी गेली २५ वर्षापुर्वी ट्रेडर्स म्हणुन बिटकॉन व क्रिप्टो करन्सीमध्ये काम करत आहे. फिर्यादीला तिच्या फोन-पे (hayatshaikh60948@ybl) वरून ७५० रुपये पाठविण्यास सांगितले. पैसे पाठवल्यानंतर आरोपीने फिर्यादीचे अभिनंदन करीत तुम्ही पहिला ट्रेड जिंकला आहात. तुम्ही आता ३९९९ रुपये व ८१०० रुपये पाठवावे लागतील. तेव्हा तुमची राशी चालु होईल. परत तिने सांगितले तुमची रक्कम काही काळासाठी अडकली असुन तुम्हाला आता १९४९९ रुपये (hayat0621@ybi) पाठवावे लागतील.
ती रक्कम मला पुढे पाठवावी लागते. फिर्यादीने तेव्हा ते पैसे तिच्या खात्यावर पाठविले. तेव्हा तिने फिर्यादीला सांगितले की, तुम्हाला जर रक्कम काढायची असेल तर माझे अॅप्लीकेश डॉऊनलोड करावे लागेल व त्यासाठी तुम्हाला ३८८८९ रु एवढी रक्कम पाठवावी लागेल. तेव्हाच तुम्हाला ही रक्कम काढता येईल. मग फिर्यादीने तिला ती रक्कम पाठविली. तेव्हा फिर्यादी तिला मी पैसे पाठविले आहेत. पण तिने फिर्यादीला काही लिंक पाठविली नाही. फिर्यादीकडे पुन्हा पैसे पाठविण्यास सांगितले. परंतु, फिर्यादीने तिला पैसे पाठविणे बंद केले. ट्रेडर्स इन्वेस्टरच्या नावाखाली फिर्यादीकडुन फोन पे व पेटीएमवरून एकुण ७१,२३७ रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी के. सुरेश काट्टामंची (वय २८ वर्षे, रा. विशाल पी.जी. राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज-१, हिंजवडी, मुळगाव-तलारीपल्ली, पाकाला, पोस्ट-मंडल, तिरुपती, आंध्र प्रदेश) यांनी आरोपी स्वँग मल्होत्रा ट्रेडर इन्वेस्टर नावाचे इस्टाग्राम प्रोफाईल व (hayatshaikh60948@ybl (hayat0621@ybl) यु.पी.आय.डी धारका विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.