न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- तळवडेतील त्रिवेणीनगर येथील टॉवर लाईन रोडवरील हाउसिंग सोसायटीत सोमवारी (दि. १२) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची वर्दी मध्यरात्री २.०७ वाजता मिळाली. त्यानुसार तळवडे अग्निशामक उपकेंद्र, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्र, चिखली अग्निशामक उपकेंद्र आणि अग्निशामक मुख्यालय येथून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
पार्किंगमधील १५ दुचाकी पूर्णपणे पेटलेल्या होत्या. एकीकडे अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तर दुसरीकडे पहिल्या मजल्यावर घरामध्ये अडकल्या चार जणांची सुटका केली. याशिवाय एका श्वानाला देखील अग्निशामक दलाने जीवनदान दिले.
अग्निशामक दलाचे प्रतिक कांबळे, मुकेश बर्वे, प्रदीप हीले, विशाल फडतरे, गोविंद सरवदे, दिनेश इंगलकर, अशोक पिंपरे, संभाजी अवतारे, काशिनाथ ठाकरे, अमोल चिपळूणकर, परेश घरत, राहुल जाधव, श्री ऋतिक पिंपळे, सचिन खाडे, पृथ्वीराज नरवाडे, रोहित मांजरे, सुशील पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


















