न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- भाची घरासमोर खेळते; त्यांच्या खेळण्याच्या आवाजाचा राग मनात धरुन फिर्यादीच्या घरासमोर येवुन आरोपीने फिर्यादीच्या आईच्या डोक्यावर, पाठीमागे व पुढे कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात वार करुन जखमी केले.
ही घटना (दि. ११) रोजी दुपारी ४.०० वा च्या सुमारास सी/ओ बबन गवारे यांची खोली, जैन मंदीराजवळ, दिघी रोड, भोसरी येथे घडली.
फिर्यादी महेश आजीनाथ ढेंबरे (वय २५ वर्षे, दिघी रोड, भोसरी) यांनी आरोपी सतिश दत्तु डोळस (वय ४२ वर्षे, दिघी रोड, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.