न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- टायरच्या दुकानाचे दीड लाखांचे कलेक्शनचे पैसे फिर्यादि यांनी होंडा अॅक्टीवा (एम.एच.२४ जे.झेड ०८४९) च्या डिक्कीत ठेवले. मित्रासह घरी जात असताना पल्सर २२० या काळया निळया रंगाच्या गाडीवर दोघे व एका मोटार सायकलवर दोघे असे चौघेजण फिर्यादीजवळ आले. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या डोळयात मिरचीची पुड टाकली. इतर आरोपींनी फिर्यादीच्या डाव्या हाताच्या तळव्यावर उलटा कोयता मारला.
फिर्यादीचा मित्र याच्याही उजव्या हाताच्या कोप-यावर उलटा कोयता मारुन गाडीची डिक्की खोलण्यास सांगितले. कोयत्याचा धाक दाखवित दोन आरोपी फिर्यादीच्या मित्राच्या मागे गेले. दरम्यान दोघांनी फिर्यादीची अॅक्टीवा गाडी घेऊन जवळच कस्ट्रक्शनचे काम सुरु असलेल्या ठिकाणी नेली. त्यांच्यामागून फिर्यादी फावडा हातात घेवुन आरोपींना मारण्यास गेलो असता दोघांनी अॅक्टीवा व त्यांची पल्सर गाडी तिथेच सोडुन तिथून पळ काढला. दुसरे दोघेजण त्यांच्या मोटारसायकलवरुन तिथून पळुन गेले.
हा प्रकार (दि. १०) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुखवानी क्लासीक बिल्डींग, मोरवाडी, पिंपरी येथे घडला. फिर्यादी जानी आकाशकुमार विष्णुप्रसाद (वय ३० वर्ष, रा. फलॅट नं ७०१, व्हिस्डम पार्क, मोरवाडी, पिंपरी) यांनी आरोपी पल्सर मोटार सायकल २२० काळया निळया गाडी त्यावरील दोन इसम व दुस-या एका मोटार सायकल वरील दोन अनोळखी इसम (वय अंदाजे २५ ते २६ वर्ष) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.