न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- पाच मजली बिल्डींगचे ४० प्लॅट लिव्ह अँड लायसन्सवर घेऊन ठरल्याप्रमाणे रक्कम फिर्यादीस न देता आप-आपसात संगणमत करून कट रचला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीचा विश्वासघात करून त्यांची फसवणुक केली. फिर्यादीच्या अॅग्रीमेटप्रमाणे ठरवलेल्या अटीचा भंग करून आरोपींनी टेरेसवरील रूमचे कुलूप तोडुन मालमत्तेचे नुकसान करीत त्यातील फिर्यादीचे इलेक्ट्रीकल सामान चोरून नेले.
डिपॉझीटचे ५५,००,००० रूपये फिर्यादी परत देत असताना आरोपींनी आम्हाला एकुण १,३५,००,००० रूपये द्या अशी खंडणीची मागणी केली. तसेच फिर्यादी व फिर्यादी यांचा भाऊ यांना वारंवार शिवीगाळ करुन, केस परत घेण्यासाठी धमकी दिली. ही घटना जानेवारी २०१९ ते आजपावतो सर्वे नं.२६१, गॅलक्सी हाईट्स, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली.
फिर्यादी रणजीत कुमार गुप्ता (वय ४४ वर्षे, रा. रणजीत हॉऊस, ९४६/९५९, न्यु नानापेठ) यांनी आरोपी महिला आरोपी, महीला आरोपी, अनुराग जैन (रा. गोपालनगर जयपुर), सौरभ हेमराज बोरा (रा. उदानी तरंग, जुहु तारा रोड, मुंबई), भारद्वाज, कृष्ण कुमार, गोलु शर्मा, इतर दोन आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.