न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- मिड नाईट अॅपल आयफोन १३ मोबाईल, दोन चार्जर, अॅडाप्टर, ग्लासेस हे साहित्य फिर्यादीने कुरीअरने पॉन्डेचरी येथे कुरिअर केले. परंतु, आरोपींनी कुरिअर केलेल्या वस्तू न देता कुरिअरमध्ये कार्बन मोबाईल मिळुन आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १) रोजी दुपारी १२.०० ते (दि. १०) रोजी ८. ३० वापर्यंत प्रोफशनल कुरिअरच्या ऑफिसमध्ये, प्रतिक्षा एन्टरप्रायजेस, सुखवानी जी/जे/प्लॉट नं.५८, एसआर नंबर १०३ ते १०८, वास्तु उदयोग शॉप नंबर ६ पिंपरी येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी प्रोफशनल कुरिअरचे मालक व कर्मचारी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.