न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- भांडणात बाजु का घेतली व मध्यस्थी का केली ? या कारणावरुन आरोपींनी संगणमत करुन फिर्यादी व त्याचा मित्र यास शिवीगाळ करुन लाथाबुक्कयांनी मारहाण केली. एका आरोपीने अचानक तेथे पडलेल्या लाकडी बांबुने फिर्यादीच्या डाव्या हातावर जोरात फटका मारुन आंगठया शेजारील बोट फॅक्चर करीत गंभीर दुखापत केली.
ही घटना (दि. ११) रोजी रात्री ८.४५ वा. पद्मावती अपार्टमेंट समोर, सार्वजनिक रोडवर, सेक्टर नं ७, एमआसडीसी भोसरी येथे घडली. फिर्यादी आकाश चंद्रकांत तापकीर (वय २३ वर्ष, रा. इंद्रप्रस्थ व्हिला, साधुराम गार्डनच्या मागे, तापकीरनगर, मोशी) यांनी आरोपी तेजेस काकडे, सिध्देश काळे, सुदर्शन काळे, स्वराज हुळावळे, साहिल शिंदे, प्रतिक (पुर्ण नाव पत्त माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
















