- भारताची संस्कृती पंचवीस हजार वर्षांपूर्वीची – निवृत्त आयपीएस प्रवीण दीक्षित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- जागतिक “मानवधिकारांच्या संरक्षासाठी जगाला देण्यासाठी भारताजवळ खूप मोठा ठेवा आहे. भारताला तथाकथित मानवाधिकार संरक्षणाच्या जागतिक संस्थांची आवश्यकता नाही, असे उद्गार रिटायर्ड डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रवीण दीक्षित ह्यांनी जागतिक मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने साजरा केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित कार्यक्रमात काढले.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना प्रवीण दीक्षित यांनी मानवाधिकार संचलनाच्या अनेक कार्यकलपांचा आढावा घेत नवीन पिढी पुढचे आव्हाने नमूद केली आणि भारताची विश्व गुरुच्या भूमिकेत कामगिरीची प्रशंसा करत मानवाधिकार या क्षेत्रात देखील मोठे योगदान देता येईल अशी आशा व्यक्त केली.
१० डिसेंबर हा दिवस जगात सर्वत्र जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. पुणे स्थित भारतीय मानवाधिकार परिषदेनी त्या संदर्भात एक कार्यक्रम आयोजित केला होता. परिषदेचे संचालक चिंतन मोकाशी यांनी मानवाधिकाराच्या संदर्भात असलेली एकूणच उदासिनता अधोरेखित करीत पाच हजार वर्षांची भारतीय संस्कृती जगाला मोठी शिकवण देऊन जाते असे प्रतिपादन केले. अशीच अमूची आई असती म्हणून कल्याणच्या सुभेदारच्या सूनेची सन्मानाने पाठवणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज, कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर अठरा औक्षणी सैन्याच्या मध्ये उभा असलेला अर्जुन मी हे घोर कर्म करणार नाही म्हणून श्रीकृष्णाला विनवतांना आजच्या मानवाधीकारांचीच पाठराखण करत होते, असे प्रतिपादन केले.
भारतीय मानावाधिकार परिषदेचे संस्थापक अविनाश मोकाशी निवृत्त पोलिस अधिकारी यांनी आपले बोसनियाच्या वास्तव्यातील आंतर्राष्ट्रीय पोलिस टास्क फोर्सचे प्रतीनिधी म्हणून आलेले आपले अनुभव नमूद करताना मानवाधिकार हा विषय सर्व सामान्यपर्यन्त पोहोचविण्याची आवश्यकता व्यक्त केली. आशीष सोनावणे यांनी संस्थेच्या कार्यकलापांचाआढावा घेत अनेक योजनांची मांडणी केली. भारतीय मानवाधिकार परिषद ही संस्था मानवाधिकारण बाबत समाजाचे उद्बोधन करणे, प्रोत्साहन देणे, योग्य ठिकाणी हस्तक्षेप करणे अशा अनेक प्रकारे जागतिक महत्व असलेली संकल्पना भारतीय समाजामध्ये रुजवण्याचे काम करीत आहे. संस्थेच्या ह्या कार्यक्रमाला समाजामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय मानवाधिकार परिषदने नव्याने दाखल झालेल्या ११ सदस्यांचा परिचय करून देत राष्ट्रीय स्तरावर भारतीय मानवाधिकार परिषदेचे कार्य नेण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला १५० नागरिक उपस्थित होते.
















