न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- एका वर्षापासून फिर्यादी महिलेचा आरोपी पाठलाग करीत होता. ‘ तु माझी गर्लफ्रेंड आहेस, मी तुझ्याशी लग्न करेन. तु माझी नाही झाली तर तुला कोणाची होऊ देणार नाही ‘ असे म्हणत धमकावित होता.
दरम्यान फिर्यादीचे नियोजीत पती व त्यांचे मित्र घरी पायी जात असताना आरोपी तिथे आला. फिर्यादी पुढे एकटी चालत असताना फिर्यादीचा हात पकडला. ‘ तुला माहित नाही का? तु माझी आहेस, तुझ्या होणा-या नव-याला सांग, तुला मी पळवून घेवून जाईन ‘ असे म्हणत फिर्यादीचा विनयभंग करीत फिर्यादीच्या नियोजित पतीला वाईट शिवीगाळ केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ११) रोजी रात्री अकरा वा. चे सुमारास ४०/३१६, आशिष चावरे बिल्डींग, तीसरा मजला, संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी सुमित प्रदिप पारंगे (रा. क्रांती युथ प्रतिष्ठानजवळ, सिंग गॅरेजजवळ, संत तुकारामनगर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


















