न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- फेसबुकवर व्हिडीओ पहात असताना त्यावर फिर्यादीला मुलाखत न्युज दिसली. त्या मुलाखतीत आरोपीने महिलांचा अवमान करणारे वक्तव्य केले. समस्त महिला वर्गाच्या मनात लज्जा व चीड निर्माण केली. आरोपीनी महिलांविरुध्द अश्लील वाक्य बोलुन महिलेची जनमाणसात प्रतिमा मलीन करण्याचे काम केले आहे.
तुम्ही प्रेम तुमच्या बायकोशी करा, तुमच्या गर्लफ्रेंडेशी करा, दुस-याच्या बायकोशी करा ते खर असलं पाहीजे, असे बाईचे वस्तुरुपी उदाहरण दिले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ७) रोजी रात्री ८. ०० वा चे सुमारास फेसबुकवर महिला बदनामीचा व्हिडीओ व्हायरल झालेला असताना घडला. फिर्यादी महिलेने आरोपी केशव क्षीरसागर (रा. पुणे, मोनं ९९६०५१९९५१, पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















