न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- पिंपरीतील सेवा विकास बँक येथे फिर्यादी महिला या मुख्य शाखेत शिपाई म्हणून नोकरीस आहेत. आरोपी हा तिथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत आहे. आरोपीने फिर्यादीला चहा आणण्यास सांगितला. फिर्यादीना टेबलखाली सफाई निट केली नाही, असे हाताने दाखवले. फिर्यादी ते बघण्यासाठी टेबलाजवळ जावुन खाली वाकून बघितले असता आरोपीने फिर्यादीसोबत अश्लील कृत्य केले.
त्यामुळे फिर्यादीस लज्जा उत्पन्न झाली. तसेच त्याबाबत कोठे वाच्यता केल्यास खोटा गुन्हा तसेच नोकरीवरुन काढून टाकण्याची आरोपीने धमकी दिली. त्यानंतरही वेळोवेळी फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सुमारे दीड महिन्यापूर्वी सकाळी ११.०० वा. सुमारास व त्यानंतर वेळोवेळी दी. सेवा विकास बँक शाखा, पिंपरी येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी मनोज लक्ष्मणदास बक्षानी (मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवा विकास बँक, पिंपरी शाखा) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















