- लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर जबरदस्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधली. तुझे न्युड फोटो तुझ्या ओळखीच्या लोकांना व नातेवाईकांना दाखवेल, अशी धमकी दिली.
फिर्यादीला मारहाण करुन जबरदस्तीने आरोपीच्या मित्राच्या फ्लॅटवर व फिर्यादी राहण्यास असलेल्या ठिकाणावर नेले. फिर्यादीची इच्छा नसताना त्यांच्यासोबत वारंवार जबरदस्ती करीत संभोग केला. त्यांना शारिरीक, मानसिक त्रास देवुन फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०१६ पासुन (दि. २५/३/२०२२) रोजीपर्यंत पिंपळे सौदागर येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी रविंद्र रामचंद्र थोरात (वय ४४ वर्षे, रा. काशीदनगर, पिंपळेगुरव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















