न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचा मित्रास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.
ही घटना (दि. १२) रोजी सायंकाळी ८ .३० वा. चे सुमारास निखील चौधरी यांची रुम, मोरया कॉलनी, राजयोग पेट्रोलपंपजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी राहुल कालीप्रसाद कुमार (वय २७ वर्षे, वाल्हेकरवाडी) यांनी आरोपी तुषार महीपती मगर (वय २३ वर्षे, रा. शेडगे वस्ती, दत्तमंदीर रोड, वाकड), प्रकाश विक्रम चौधरी (२० वर्षे, रा. भोंडवे वस्ती, मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी), किरण नानवरे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
















