न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरामधून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. वर्क फ्रॉम होमला मुभा असल्याने अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्यामध्ये अडथळा येतो. मात्र, यापुढे करसंकलन विभागाच्या वतीने अशा व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे.
अनेक व्यावसायिक दुकाने, तसेच ऑफिस घेऊन व्यवसाय करणे परवडत नसल्याने, घरामधूनच व्यवसाय केला जातो. मात्र, असे व्यावसायिक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करताना वर्क फ्रॉम होम असून, काम कंपनीचेच असल्याचे सांगितले जाते. बहुतांश कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे कर्मचारी घरूनच काम करतात. मात्र, या संधीचा फायदा घेत, काही व्यावसायिकांनी घरामध्येच कार्यालय थाटले आहे.
त्या ठिकाणी ठरावीक पालिका क्षेत्रात सहा लाख मालमत्ता पिंपरी चिंचवड शहरामध्ये ५ लाख ८६ हजार ५९८ निवासी व बिगरनिवासी मिळकती आहेत. त्यांच्याकडून करसंकलन विभागाच्या वतीने करवसुली केली जाते. नियमानुसार घरामधून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नियमानुसार व्यवसाय करावा. असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
घरामधून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी वर्क फ्रॉम होमचा अडथळा येतो. अनेक नागरिक वर्क फ्रॉम होमचे कारण देतात. मात्र, मोठा व्यवसाय असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – नीलेश देशमुख, सहायक आयुक्त.


















