न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसप्ताह निमित्त रहाटणीत रहाटणी प्रीमियर लीग (RPL) या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आंतर सदनिका (Inter society matches) स्पर्धेस (दि. ६) रोजी दिमाखात सुरुवात झाली होती. RPL ह्या अभिनव क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आ. उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी टीम परेड सोबत ओळख करून टॉस उडवून उद्घाटन केले होते. या स्पर्धेला नोंदणी प्रक्रियेपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ४८ संघ सहभागी झाले. ‘ bhoomkshtij Society’ ह्या महिला संघाचा सहभाग लाक्षणिक होता. एकूण ७ दिवस ही स्पर्धा उत्साहात आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी अंतिम सामना पार पडला.
याप्रसंगी माजी खा. अमर साबळे, मा. महापौर उषा (माई) ढोरे, नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, माजी नगरसेविका सविता चंद्रकांत नखाते, ह.भ.प. शारदाताई मुंडे, चिंचवड विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, हनुमंत साहेब, आयोजक शुभम चंद्रकांत नखाते युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
या स्पर्धेदरम्यान नगरसेवक बाबा त्रिभुवन, माजी नगरसेवक तुषार कामठे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, दराडे, शंकर नढे, माऊली नढे, अरुण चाबुकस्वार, काळुराम नढे, दिपक नागरगोजे, अमोल नखाते, सुनील नखाते, अमोल नखाते, युवराज नखाते, संदीप नखाते, अनिल गोडांबे, ऋषिकेश नखाते, आकाश नखाते, गणेश ढाकणे, बापूसाहेब जाधव आदींनी भेट दिली. अंतिम सामन्याचे विजेते Wardhman Heights व उपविजेते Arena-29 अनुक्रमे हे होते. विजेते संघ व सहभागी संघ यांना आकर्षक भेटवस्तू व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विकासाची कामे करत असताना नागरिकांना मनोरंजन व खेळ यासाठी मुबलक संधी व व्यासपीठ उभे करणेदेखील गरजेचे आहे या सम्यक धोरणाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन चंद्रकांत आण्णा नखाते यांनी यावेळी केले.
स्पर्धेचे संपूर्ण आयोजन शुभम चंद्रकांत नखाते युथ फाऊंडेशन व कार्यकर्ते यांनी केले व कार्यक्रम सुरेख पार पाडला.


















