न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२२) :- कंपनीत फिर्यादी कामावर होते. त्यावेळी सायबर फ्रॉड साईडवरील इसमाने फिर्यादीला फोन केला. फिर्यादीची ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये ५७००० रुपयांची झालेली फसवणुकीची तक्रार घेण्यासाठी व ती रक्कम परत करण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडुन त्यांचे बँक डिटेल प्राप्त केले. त्यांचे अकाऊंट हॅक करुन दुसरे अकाऊंट रजिस्टर करुन फिर्यादीच्या बँक खात्यातील २००,४२६ रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सपर करीत फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक केली.
हा प्रकार (दि. ३०/०८/२०२२) रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.४५ वा.पर्यंत एपीजे इनव्हेस्मेंट प्रा. लि. कंपनी, एच पी चौक, महाळुंगे येथे घडला. फिर्यादी धर्मेद्रकुमार जगदीशप्रसाद शर्मा (वय ४९ वर्षे, रा. गोविंद रिजेन्सी, दुसरा मजला फ्लॅट नंबर-२०२ महाळुंगे) यांनी आरोपी सायबर फ्रॉड साईडवरील फोन नंबर ०६२८९६४९३०७, मोबाईल फोन नंबर ७६९९६९३६४२ व व्हॉटस्अॅप नंबर ९६६८४३९०५२ वरील अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चाकण म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















