न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- बालवाडी शाळेतील मुलाला बाथरुम दाखवत असताना एक अनोळखी इसम फिर्यादीजवळ आला. त्यावेळी फिर्यादी आई-वडीलांसोबत फोनवर बोलत होत्या. दरम्यान आरोपीने फिर्यादीसोबत अश्लील कृत्य करीत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
फिर्यादीने त्याला ‘ माझ्या अंगाला हात लावु नका ‘ असे म्हणाल्या तेव्हा अज्ञात इसमाने ‘ तुझ्या आई – वडीलांना तु लहान मुलासोबत बाथरुमध्ये गेली होती असे सांगतो ‘ म्हणत धमकी देत पळुन गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी दुपारी ३:०० वा. सुमारास शिंदेवस्ती, एम.आय.डी.सी रोड, रावेत येथे घडला. १७ वर्षीय फिर्यादी महिलेने आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.
















