- अमरावती, सोलापूर, नगर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड संघांची चमकदार कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनाद्वारे आयोजित आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा मदनलाल धिंग्रा मैदान निगडी येथे नुकत्याच ९ ते ११ डिसेंबर दरम्यान उत्साहपूर्वक वातावरणात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन आ. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धा इंडियन, रिकर्क, कम्पाउंड या तीन प्रकारामध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी ३४ जिल्ह्यातील ४०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतून निवडलेले स्पर्धक व त्यांचा चमु यांना आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेचे मुख्य आयोजक व आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनल बुंदेले यांनी लिहलेला “धनुर्विद्या” ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. धनुर्विद्या खेळाबाबत इत्तभूत माहिती या पुस्तकातून नवोदित खेळाडूंना मिळनार आहे. उदघाटनप्रसंगी पिंपरी चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश फुगे, पॅरा मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू अमोल बोरिवाले आणि छत्रपती पुरस्कार विजेते श्रीधर आखाडे यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
तीन दिवसीय स्पर्धा कार्यक्रमास भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्राचा पहिला ऑल्मपिक खेळाडू प्रविण जाधव, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विदयालयाचे प्राचार्य देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे छायावती देसले युवा उदयोजक विशाल सरवदे, पिंपरी चिंचवड जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षिस वितरण अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, इंडियन डेन्टल असोसिएशन पिंपरी चिंचवड च्या अध्यक्ष डॉ मनीषा गरुड यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. विजेत्यांना सन्मानपूर्वक ब्राँझ सिल्व्हर व गोल्ड मेडल्स देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल…
इंडियन राऊंड मुले प्रथम- आभूदय पाखले(अमरावती) द्वितीय- आयुष शिळीमकर(पुणे) तृतीय- प्रज्वल जगताप(सोलापूर), इंडियन राऊंड मुली प्रथम- समीक्षा देशमुख(सोलापूर) द्वितीय- संस्कृति काकडे(रायगड) तृतीय- गाथा खडके(सोलापूर), रिकर्क राऊंड मुले प्रथम- यशदीप रोकडे(अहमदनगर) द्वितीय- आदित्य पवार (सोलापूर) तृतीय- गौरव गोडसे(सातारा), रिकर्क राऊंड मुली प्रथम- शरवरी शेंडे (पिंपरी चिंचवड) द्वितीय- वैष्णवी कुलकर्णी(नाशिक) तृतीय- शौर्य सुरवसे(पुणे), कंपाऊंड राऊंड मुले प्रथम- जय जाधव(सोलापूर) द्वितीय- वेदान्त लंचहोडे(नागपूर) तृतीय- ओम मानकर(नागपूर), कंपाऊंड राऊंड मुली प्रथम- वैष्णवी परदेशी(नाशिक) द्वितीय-रेनशा वाबळे(पुणे) तृतीय- स्मृति विरपे (सोलापूर).
















