न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- ‘ टूरिस्ट पॅकेज देतो ‘ असे खोटे आश्वासन देत फिर्यादी यांना पैसे भरण्यास भाग पाडले. कोणतीही सेवा न देता फिर्यादी यांची ५५,००० रु. ची आर्थिक फसवणुक केली आहे.
तसेच फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर त्यांच्यासारख्याच इतर १० लोकांची एकुण ४,९०,००० रुपये अशी एकुण ५,४५,००० रुपयांची तसेच आणखी ब-याच लोकांची फसवणुक केल्याची शक्यता असल्याचे फिर्यादी यांना समजले, असे फिर्यादीत म्हटल आहे.
हा प्रकार (दि. १/५/२०२२) ते (दि. ८/०५/२०२२) रोजी १२.०० वा. दरम्यान द हब, तिसरा मजला, डांगे चौक, थेरगाव येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी सुनिल गौतम सरोदे (वय ३५ वर्षे, अंदाजे रा. चिंचवडेनगर), शुभम शिवाजी पवार (वय ३५ वर्षे अंदाजे रा. फलटण), आशिष (वय ३७ वर्षे, अंदाजे रा. विमाननगर पुणे, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), रवि गुप्ता (वय ३४ वर्षे), शैलेंद्र गायकवाड (अंदाजे पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















