न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- सीबीएसई साऊथ झोन आयोजित स्केटिंग स्पर्धेत चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सीबीएसई साऊथ झोन स्केटिंग स्पर्धेत यश संपादन केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.
यामध्ये १० वर्षाखालील मुलांमध्ये येश रावदेव, १२ वर्षाखालील श्रवण बिजागुप्पी, १४ वर्ष मुले अथर्व गडवी, १२ वर्षाखालील मुलीमध्ये काव्या सिंह हिचा समावेश आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शहनाज कोटार, उप प्राचार्य मनिषा घोसरवडे, वैशाली रणसुबे यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.