न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भोसरी, निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात दोन रिक्षा आणि एक दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत काळया पिवळया रंगाची दीड लाख रुपये किमतीची TVS कंपनीची रिक्षा (आर.टी.ओ क्र. MH-14/JP-1897) ही पार्क व लॉक करून ठेवली असता ती अज्ञात चोरटयाने रिक्षाचे लॉक उघडून ती चोरी करून नेली आहे. हा प्रकार (दि.९) रोजी ११.०० वा. ते (दि. १०) रोजी सकाळी ७.३० वा. चे सुमा. सी/ओ महेश लक्ष्मण गवळी यांची शिव शंकर गवळी बिल्डींग, शंकराचे मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत, भोसरी येथील सार्वजनिक रोडच्या कडेला घडला. फिर्यादी सुधिर नवनाथ भोरे (वय ३२ वर्षे, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत टीव्हीएस कंपनीची ८०,००० रु. किं. ची काळया पिवळया रंगाची रिक्षा (एम.एच.१४/ एच.एम.५१४४) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना (दि. १३) रोजी ९.०० ते (दि. १४) रोजी पहाटे ५.०० वा. चे दरम्यान साईबाबनगर, मारुती मंदिराच्या बाजुला, चिंचवड रेल्वे स्टेशन रोड, चिंचवड या ठिकाणी घडली. फिर्यादी सुधिर वसंतराव दरेकर (वय ४५ वर्षे, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात आरोपी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या घटनेत होंडा कंपनीची युनिकॉन काळ्या रंगाची ५०,००० रुपये किंमतीची दुचाकी गाडी आर. टी. ओ. नंबर (MH.14/HF. 4229) लॉक करुन पार्क करुन ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. ही घटना (दि. १४) रोजी रात्री १२.३० ते सकाळी ९.०० वा. दरम्यान भारतमातानगर, खराळवाडी, पिंपरी येथील सार्वजनिक रोडवर घडली. फिर्यादी संदिप रामचंद्र कटारिया (वय ३५, खराळवाडी पिंपरी) यांनी अनोळखी इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















